१)
१८५७ च्या उठावाचा गुप्त
संदेश चपाती किंवा भाकरी व लाल कमळाद्वारे पसरविल्या जात होता.
२)
८ एप्रिल १८५७ या दिवशी
मंगल पांडेला फाशी देण्यात आली.
३)
१८५७ च्या क्रांतिकारकांनी
नानासाहेबास पेशवा म्हणून घोषित केले होते.
४)
तत्कालीन सर्वच
सत्ताधीशांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला नाही.
५)
दामोदरराव हे झाशीच्या राजा
गंगाधररावांनी मृत्युपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते.
६)
इंग्रजांनी अकबरशहा या मोगल
बादशहाची पेन्शन बंद केली होती.
७)
बहादुरशहा दुसरा यांचे
मृत्युसमयी वय ८७ वर्षे होते.
८)
जॉन लॉरेन्स यांच्यामते
१८५७ चा उठाव म्हणजे शिपायांचे बंड होते.
९)
इंग्रजांनी भारतीयांच्या
सामाजिक जीवनात केलेल्या हस्तक्षेपाचा भारतीयांवर विशेष परिणाम झाला नाही. असे
१८५७ च्या उठावासंदर्भातील अयोग्य विधान होते.
१०)
ईश्वरचंद्र विद्यासागर
यांच्या प्रयत्नाने सिविल म्यारेज अक्त संमत झाला.